नड्डांना संघराज्य पद्धत संपवायची आहे का? - उद्धव ठाकरे

मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना भाजपवर सडकून टीका केली.
Uddhav Thackeray_ShivSena
Uddhav Thackeray_ShivSena

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भारताची संघराज्य पद्धत संपवायची आहे का? असा सवाल शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. (J P Nadda want to end the federal system of India question raised by Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray_ShivSena
अडीच वर्षात पाच वर्षांची काम करायचीत; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

उद्धव ठाकरे म्हणाले, "मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे कालपर्यंत मुख्यमंत्री होतो. पुन्हा शिवसेनेची सत्ता येणारच आहे, हे येणं जाण सुरुच असतं. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जे बोलले की देशात एकच पक्ष राहणार आहे आणि बाकीचे पक्ष विशेषतः शिवसेना संपत चालली आहे, तर बघू काय होतंय. त्यांनी ज्यांना प्रदेशाध्यक्ष केलं आहे त्यांच्या नावामध्ये किती कुळं आहेत? हे माहिती नाही. पण त्यांच्या नावातील ५२ कुळं आली तरी ते शिवसेना नष्ट करु शकत नाहीत"

Uddhav Thackeray_ShivSena
...तर हा कसला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव? उद्धव ठाकरेंचा केंद्राला सवाल

प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे ही लोकशाहीसाठी घातक पद्धत आहे. देशाच्या स्वातंत्र्याची जी मांडणी झालेली आहे, ती संघराज्य अशी आहे. यामध्ये अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत. यामध्ये इतर राज्यांप्रमाणं महाराष्ट्राचाही समावेश आहे. ही सर्व घटकराज्ये एकत्र येऊन आपल्या देशाचं स्वातंत्र्य अस्तित्वात आलं आहे. म्हणून आपल्या देशाला संघराज्य म्हणतात. मग नड्डांना नक्की काय म्हणायचं आहे? तुम्हाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत म्हणजे संघराज्य पद्धत तुम्हाला नको आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

Uddhav Thackeray_ShivSena
52 असो वा 152 कुळे शिवसेना संपणार नाही; उद्धव ठाकरेंचा बावनकुळेंना टोला

दरम्यान, संघराज्य नको हे तुमचं मत म्हणजे साऱ्या देशातील नागरिकांचं मत आहे का? यावर खऱ्या निवडणुका व्हायला हव्यात. आज तुम्ही गादीवर बसला आहात म्हणून म्हणाल की, हम करे सो कायदा तर हे होणार नाही. ही आझादी आणि त्याचा अमृतमहोत्सव नाही. अमृतमहोत्सवीच जर तुम्हाला देशाची लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर तो अमृतमहोत्सव कसला?, अशा कठोर शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com