
Wife attacks husband
ESakal
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर भागात एका पत्नीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पत्नीने तिच्या पतीवर उकळते तेल ओतले. नंतर त्याच्या जखमांवर मिरची पावडर शिंपडली. या घटनेतील पीडितची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. सध्या तो सफदरजंग रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्याच्या आयुष्यासाठी झुंजत आहे.