Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...

वृत्तसंस्था
Wednesday, 25 March 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन केल्यामुळे एका महिलेने पंतप्रधानांकडे एक मागणी केली आहे. संबंधित महिलेचा टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन केल्यामुळे एका महिलेने पंतप्रधानांकडे एक मागणी केली आहे. संबंधित महिलेचा टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल?'

कोरोना व्हायसमुळे अनेकजण घरामधून काम करत आहेत. परंतु, याचा त्रास महिलांना होत असल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. एका महिलेचा टिकटॉक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात या महिलेने पंतप्रधानांना एक विनंती केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'शहरांना लॉकडाउन केले त्याप्रमाणे घरातील किचनही लॉकडाउन करा. पती घरातच राहत असल्याने दर अर्ध्या तासाला चहा, चिप्स, भजी, चपाती, भात  आदी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मागणी करतात. त्यामुळे हैराण झाले आहे.'

@komalashish01

jai hind????hum ladies kisi waat lg jaye

? original sound - komalAshish422291

संबंधित व्हिडीओ त्या महिलांसाठी अधिक खास आहे ज्यांचे पती वर्क फ्रॉम होम करत आहेत. घरात येणाऱ्या अडचणी एक महिलेने गमतीदारपणे मांडल्या आहेत. महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

देशात लॉकडाउन अन् जोडप्याचे मोटारीत नको ते उद्योग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife upset over working from husbands home video viral