...तर मी ही बंदूक उचलेन; विकास दुबेची पत्नी मीडियावर भडकली

wife of vikas dubey, Richa Dubey, vikas dubey encounter
wife of vikas dubey, Richa Dubey, vikas dubey encounter

कानपूर : कुख्यात गुंड विकास दुबे याचा शुक्रवारी पोलिस एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आला. पोलिसांनी त्याच्याविरोधात केलेल्या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत. उत्तर प्रदेश पोलिस पथकातील एका अधिकाऱ्यासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांवर गोळीबारात जीवे मारुन फरार झालेल्या विकास दुबेला मध्य प्रदेशातील उज्जैनमधून अटक करण्यात आली होती. त्याला स्पेशल टास्क फोर्सचे जवान उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जात असताना बर्रा येथे पोलिसाच्यां ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. या घटनेनंतर जखमी जवानांची पिस्तूल हिसकावून घेत विकास दुबेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर पोलिसांवर गोळीही झाडली. आत्मरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार करावा लागला, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

कानपूरमधील भौंतीमध्ये झालेल्या एन्काउंटरनंतर विकास दुबेवर भारव घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विकास दुबेची पत्नी ऋचा या देखील घाटावर पोहचल्या होत्या. प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा मारा केला. यावेळी विकास दुबेच्या पत्नीने संतापजनक प्रतिक्रिया दिली. विकासने अनेक हत्या केल्या नव्हत्या का? असा प्रश्न प्रसारमाध्यमातील एकाने  ऋचा यांना विचारण्यात आला होता. यावर विकासची पत्नी म्हणाली. केला असला तर तू कोण आहेस विचारणारा. ज्यांनी चूक केली आहे त्याला शिक्षा होणारच. गरज पडल्यास बंदूक उचलायलाही मागे पुढे पाहणार नाही, असेही ऋचा यांनी यावेळी म्हटले. तुम्ही पहिल्यांदा मारायला लावता आणि पुन्हा प्रश्न विचारायला येता, अशा शब्दांत त्यांनी  प्रसारमाध्यमांवर आपला राग व्यक्त केला.   

रडत आणि ओरडत प्रसारमाध्यमांवर राग व्यक्त करताना ऋचा यांनी आपला पती दोषी होता हे देखील मान्य केले. एवढेच नाही पोलिसांनी जे केलं ते योग्यच आहे, असेही त्या म्हणाल्या. विकास दुबे चुकीचा होता का? या प्रश्नावर ऋचा यांनी होय असे उत्तर दिले. विकास दुबेचा एन्काउंटर होण्यापूर्वी ऋचा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. एन्काउंटरपूर्वीच त्यांना आणि त्यांच्या मुलाला पोलिसांनी सोडून दिले. विकासने केलेल्या गुन्हामध्ये त्यांचा कोणताही संबंध नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com