Wife was thrown from the fourth floor Live in a relationship love affair
Wife was thrown from the fourth floor Live in a relationship love affairWife was thrown from the fourth floor Live in a relationship love affair

पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले अन् चौथ्या मजल्यावरून फेकले

आगरा : प्रियकरासोबत (love affair) ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेची पतीने बहिणीला सोबत घेऊन हत्या केली. रितिका नावाच्या महिलेला पतीने प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते. पती अमित गौतम याने बहिणीसह रितिकाला प्रियकर विपुलसमोर ओमश्री अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून फेकले. त्यामुळे रितिकाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. (Wife was thrown from the fourth floor)

प्राप्त माहितीनुसार, रितिकाचे लग्न २०१४ मध्ये फिरोजाबाद येथील अमित गौतमसोबत झाले होते. रितिका मूळची गाझियाबाद येथील रहिवासी आहे. पती अमितसोबतच्या मतभेदानंतर रितिका जवळपास दीड वर्षांपासून प्रियकर विपुलसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (Live in a relationship) राहत होती. दुसरीकडे पती अमित बराच काळ रितिकाला शोधत होता.

Wife was thrown from the fourth floor Live in a relationship love affair
चीन, ईस्ट इंडिया कंपनीत साम्य नाही; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य

इतक्यात रितिका ओमश्री अपार्टमेंटमध्ये असल्याची माहिती अमितला मिळाली. अमित बहिणीसोबत अपार्टमेंटमध्ये पोहोचला. तेव्हा त्याला रितिका प्रियकरासोबत (love affair) आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. यानंतर त्याने रितिकाचे हात बांधले आणि नंतर अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून फेकून दिले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी महिलेचा पती अमित आणि बहिणीला अटक करून तपास सुरू केला आहे. दुसरीकडे एसएसपी सुधीर कुमार सिंह म्हणाले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com