esakal | पत्नीचा मृतदेह घरात, तर पतीची ब्रिजवर गळा आवळून हत्या; नव्यानेच सुरू केला होता संसार
sakal

बोलून बातमी शोधा

wifes body at home while husband strangled to death on railway over bridge in Gaya Bihar

बिहारमधील गया येथे एका नवविवाहित जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेत मारेकऱ्याने नवरा-बायकोचा गळा आवळून खून केला. ही घटना बुनियादगंज पोलीस स्टेशन परिसरातील खानजहापूर गावात घडली आहे.

पत्नीचा मृतदेह घरात, तर पतीची ब्रिजवर गळा आवळून हत्या; नव्यानेच सुरू केला होता संसार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पटना : बिहारमधील गया येथे एका नवविवाहित जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेत मारेकऱ्याने नवरा-बायकोचा गळा आवळून खून केला. ही घटना बुनियादगंज पोलीस स्टेशन परिसरातील खानजहापूर गावात घडली आहे. महिलेचा मृतदेह खानजहांपूर येथील त्यांच्या घरात सापडला तर, घरापासून सुमारे एक किमी. अंतरावर असलेल्या मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरातील रेल्वे ओव्हरब्रिजजवळ तिच्या पतीचा मृतदेह मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळी मुफस्सिल पोलिस स्टेशनमध्ये एका युवकाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी रेल्वेच्या ओव्हरब्रिजवरून युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला. आवश्यक कारवाईनंतर पोलिसांनी मृतदेह अज्ञात समजून त्याला पोस्टमार्टमसाठी पाठविले. दुपारनंतर अभिषेकची पत्नी सीमा कुमारी हिच्या हत्येची बातमी शेजारच्या लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर बुनियाडगंज पोलिसांनी सीमाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. घरात इतर कोणीचं नव्हतं, यामुळे पत्नीचा खून करून अभिषेक फरार झाल्याचा ग्रामस्थांना संशय आला होता. नवविवाहित सीमा कुमारीच्या हत्येची बातमी ऐकताच तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. येथे सीमाच्या बहिणीने तिची ओळख पटवली. पुढील तपास हे पोलिस करत आहेत.

एअर इंडियाचा मोठा निर्णय; या तारखेपासून सुरु करणार विमानसेवा

दरम्यान, अभिषेक मूळचा जहानाबाद येथील मखदूमपूरचा रहिवासी होता आणि तो बनियागडगंजच्या खानजहांपुरात येथे नवीन घर बांधून आपली पत्नी सीमा हिच्यासह राहत होता. नोव्हेंबर २०१९मध्ये दोघांनी थाटामाटात लग्न केले होते.