Forests Of Nainital : नैनितालच्या जंगलात वणवा उत्तराखंडचा श्वास गुदमरला

लष्कर, हवाईदलही मैदानात
Forests Of Nainital
Forests Of Nainitalesakal

डेहराडून ः उत्तराखंडमधील नैनितालच्या जंगलातील वणव्याने आक्राळविक्राळ रूप धारण केल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. मागील साठ तासांपेक्षाही अधिक काळापासून शेकडो हेक्टर परिसरामध्ये हा वणवा पसरत चालल्याने राज्य सरकारने हवाई दल आणि भारतीय लष्कराची मदत घेतली आहे. आग पसरलेल्या भागामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाण्याचा वर्षाव केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी यांनी आज हल्दवानी येथे जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधत राज्यातील नेमकी स्थिती जाणून घेतली.

Forests Of Nainital
Nashik Crime News : वन विभागाच्या कारवाईत खैर जप्त; 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हा दाखल

आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा वणवा असल्याने आम्ही आमच्यापद्धतीने सर्वोतपरी मदत करत आहोत. आम्ही लष्कराकडे देखील मदत मागितली असल्याचे धामी यांनी नमूद केले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लडियाकाटा एअरफोर्स, पाईन्स, गेठिया बलदियाखान, एरीज आणि बारा पत्थर भागातील जंगलामध्ये वणव्याची तीव्रता अधिक आहे. राज्यातील जंगलात तब्बल ३१ ठिकाणांवर आगीच्या घटना समोर आल्या असून त्यात कुमाउच्या जंगलातील २६ ठिकाणांवरील आगीचा समावेश आहे. सुदैवाने गढवाल मंडळामध्ये कोठेही आगीची घटना उघड झालेली नाही.

Forests Of Nainital
Nashik News : कोट्यधीश माजी आमदार गावितांच्या संपत्तीत अल्पशी वाढ; 5 वर्षांत अवघ्या 13 लाखांची भर

चमौलीत वेगवेगळ्या ठिकाणी आग

चमौलीतील जंगलामध्ये पुन्हा एकदा आगीचा भडका उडाला आहे. पाच वेगवेगळ्या ठिकाणांवर आगीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये मोठी वनसंपदा भस्मसात झाली आहे. चीडच्या जंगलामध्ये आगीने विक्राळ रूप धारण केल्याचे दिसून येते. येथील अभियांत्रिकी महाविद्यालयास लागून असलेल्या जंगलामध्ये मोठा वणवा भडकला होता तो लष्करी छावणीपर्यंत जाऊन पोचला.

दिवसभरात

- नैनीतालमधील हायकोर्ट कॉलनीला झळा

- अनेक भागांतील सार्वजनिक वाहतूक बंद

- आगीचा वणवा एअरफोर्स स्टेशनजवळ

- नैनी लेकमधील बोटिंगची सेवाही बंद

- वनविभागाकडून अहोरात्र मेहनत सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com