मी पुन्हा मुख्यमंत्री होणारच : सिद्धरामय्या 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

हसन (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळूनही आघाडीमध्ये दुय्यम स्थान स्वीकारावे लागलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी पुन्हा त्यांच्या मनातील इच्छा उघडपणे बोलून दाखविली आहे. 'मला जनतेचा पाठिंबा आहे. मी मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेईन', असे वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केले. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आघाडी सरकार आहे. 

224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत भाजपला 104 जागा मिळाल्या. पण सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेसला 80, तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला 37 जागा मिळाल्या. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाशी आघाडी करून एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये सर्वांत कमी जागा मिळूनही कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला. 

हसन येथे झालेल्या एका जाहीर सभेमध्ये सिद्धरामय्या यांनी या विषयावर वक्तव्य केले. 'मला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. राजकारणात पैसे अणि जातीवरच अधिक भर दिला जात असून त्याचाही फटका बसला', असे सिद्धरामय्या म्हणाले. "जनता मला पाठिंबा देईल आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, असे मला वाटले होते. दुर्दैवाने मी पराभूत झालो; पण हा शेवट नाही. राजकारणामध्ये जय-पराजय नेहमीच होत असतात', असेही ते म्हणाले. 

सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलामध्ये खटके उडू लागल्याच्या चर्चा होत आहेत. किंबहुना, 'आघाडी सरकारचे विष मला पचवावे लागत आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील मतभेद उघड झाले होते. 

Web Title: Will become Karnataka CM again, says Siddaramaiah