Government Schemes in War : युद्धकाळात लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार का? सरकारी योजना बंद होणार? जाणून घ्या

Government Schemes Rules in War Situations : युद्धजन्य परिस्थितीतही सरकारकडून गरजूंना कल्याणकारी योजनांचे लाभ मिळत राहणार की नाही जाणून घ्या.
Government Schemes Rules in War Situations
Government Schemes Rules in War Situationsesakal
Updated on

देशाच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. "युद्धजन्य परिस्थितीत सरकारी कल्याणकारी योजनांचे लाभ मिळत राहतात का?" देशाची अर्थव्यवस्था, प्रशासन आणि सामाजिक यंत्रणा या सगळ्यांवर युद्धाचा परिणाम होतो, हे जरी खरं असलं तरी काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी सरकार विशेष काळजी घेतं.

सध्याची परिस्थिती काय सांगते?

सध्या भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढलेला असताना, देशांतर्गत अनेक कल्याणकारी योजना मात्र सुरूच आहेत.

  • मनरेगा अंतर्गत मजुरांना मजुरी मिळत आहे

  • उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरचे रिफिल मिळत आहे

  • शेतकरी सन्मान निधीचे हप्ते नियमित खात्यात जमा होत आहेत

हे दाखवून देतं की युद्धजन्य स्थिती असूनही सरकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचतो आहे.

Government Schemes Rules in War Situations
ISRO EOS : इस्रो पुढच्या 5 वर्षात अवकाशात पाठवणार 52 पृथ्वी निरीक्षण उपग्रह, देशाच्या सुरक्षेसाठीचा खास प्लॅन जाणून व्हाल शॉक

युद्धात योजना बंद होतात का?

भारतीय संविधानामध्ये “युद्ध सुरू झाल्यावर सर्व योजना आपोआप बंद होतील” असा कुठलाही स्पष्ट नियम नाही. मात्र, जर राष्ट्रपतींनी राष्ट्रीय आणीबाणी (कलम 352) लागू केली, तर काही अधिकार आणि यंत्रणांवर मर्यादा घालता येतात.

तरीही, प्रशासनाच्या निर्णयानुसार अनेक योजना सुरू ठेवण्याचा अधिकार सरकारकडे असतो. म्हणजेच जर सरकारने योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला तर त्या सुरूच राहतात. अगदी युद्धाच्या पार्श्वभूमीवरसुद्धा.

कलम 352 नेमकं काय आहे?

  • हे कलम राष्ट्रपतींना काही घटना तरतुदी निलंबित करण्याचा अधिकार देतं, जेव्हा देशावर बाह्य आक्रमण किंवा युद्धाचा धोका असेल.

  • या काळात नागरिकांचे काही मूलभूत अधिकार स्थगित केले जाऊ शकतात.

  • राज्यांमधील अधिकार केंद्राकडे वर्ग करण्यात येऊ शकतात. मात्र, या तरतुदींमुळे कल्याणकारी योजना पूर्णपणे थांबतील असं आवश्यक नाही.

Government Schemes Rules in War Situations
Samsung Galaxy F56 : आला रे आला, बजेट फोन आला! सॅमसंगने लॉन्च केला ‘F सिरीज’चा न्यू 5G मोबाईल, दमदार फीचर्स अन् किंमत फक्त...

इतिहास काय सांगतो?

  • 1962 चे चीन युद्ध, 1965 आणि 1971 चे पाकिस्तान युद्ध या सर्व काळातदेखील रेशन, पेन्शन आणि इतर सामाजिक योजना सुरू होत्या.

  • सरकारचं मुख्य उद्दिष्ट असतं की सामान्य नागरिकांमध्ये असंतोष पसरू नये आणि सामाजिक समतोल राखला जावा. काहीवेळेस सैन्य कारवाईमुळे स्थानिक यंत्रणा प्रभावित होते.

  • तात्पुरते योजनांचे व्यवहार थांबू शकतात, पण ती कायमची अडथळा नसतो.

  • परिस्थिती सामान्य होताच सर्व लाभ पुन्हा पूर्ववत मिळायला सुरुवात होते.

Government Schemes Rules in War Situations
Operation Sindoor Weapon : भारताने "ऑपरेशन सिंदूर"साठी वापरलेली प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम काय आहे?

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानमधील हल्ले

गेल्या काही दिवसांत भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमधील 12 शहरांमध्ये 25 ड्रोन हल्ले झाल्याचं समोर आलं आहे. लाहोरसारख्या महत्त्वाच्या सैन्य स्थळाजवळ स्फोट झाले असून पाकिस्तानची एअर डिफेन्स प्रणाली फेल ठरल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे.

देश युद्धजन्य परिस्थितीत असो वा संकटात, सरकारचा प्रयत्न असतो की सामान्य नागरिकांवर त्याचा परिणाम कमी व्हावा. म्हणूनच आजही भारत सरकार अनेक योजनांचे लाभ नागरिकांच्या खात्यात पोहोचत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com