MPSC: PSI पदासाठी नाशिक केंद्रावरील नियोजित मुलाखती ढकलल्या पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSC: PSI पदासाठी नाशिक केंद्रावरील नियोजित मुलाखती ढकलल्या पुढे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक पदाकरीताच्या परीक्षेबाबतची महत्त्वाची माहिती येत आहे. या परीक्षेसाठीची शारीरिक चाचणी आणि मुलाखती या नाशिक केंद्रावर दिनांक 29 नोव्हेंबर, 2021 ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.

मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव या काळातील नियोजित शारीरिक चाचणी व मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. नवीन तारखा लवकरच कळवल्या जातील, असंही सांगण्यात आलं आहे. याबाबतची माहिती लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

loading image
go to top