'अर्धी लढाई जिंकलीय', आता...का म्हणाली क्रांती रेडकर असं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'अर्धी लढाई जिंकलीय', आता...का म्हणाली क्रांती रेडकर असं?
'अर्धी लढाई जिंकलीय', आता...का म्हणाली क्रांती रेडकर असं?

'अर्धी लढाई जिंकलीय', आता...का म्हणाली क्रांती रेडकर असं?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील लढाई अद्याप सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून या लढाईला वैयक्तिक स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. वानखेडे यांनी मलिक यांच्या जावयावर कारवाई करुन त्यांना अटक केली होती. त्यामुळे ते त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी जाणीवपूर्वक मागे लागल्याचे वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी म्हटले होते. यापूर्वी देखील मलिक यांच्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी सांगताना केवळ व्देषभाव मनात ठेवून आरोप प्रत्यारोप केल्याचे त्यांनी सांगितले.

आता वानखेडे यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. यावेळी कोर्टानं वानखेडे यांना दिलासा देताना मलिक यांना खडसावले आहे. यापूर्वी देखील कोर्टानं सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्यापेक्षा कोर्टात हजर राहावे असं मलिक यांना बजावले होते. आता कोर्टानं त्यांना सांगितलं आहे की, सोशल मीडियावर एखादी गोष्ट शेयर करताना त्याची खातरजमा करणे गरजेचे आहे. सध्याच्या घडीची वानखेडे आणि मलिक यांच्या वादातील मोठी घडामोड समोर आली आहे. त्यामध्ये कोर्टानं यापुढील काळात मलिक यांना वस्तुस्थिती तपासण्यास सांगितलं आहे.

आपण जे आरोप करत आहात त्याविषयी पूर्ण माहिती घ्यावी असंही सांगितलं आहे. यावर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचे व्टिट व्हायरल झाले आहे. यावेळी त्यांनी आपल्या व्टिटममध्ये म्हटले आहे की, प्रत्येकवेळी व्देष कामाला येत नाही. आपण काय आरोप करत आहोत ते एकदा तपासुन घ्यायला हवेत. न्यायालयानं जे काही सांगितलं आहे त्यावरुन आपला न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी बळकट झाला आहे. अशाप्रकारे आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. असं क्रांती यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: अभिनेता कमल हसन रुग्णालयात दाखल

loading image
go to top