आगामी लोकसभा लढविणार नाही : उमा भारती

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

भोपाळ : काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आगामी 2019 लोकसभा लढविणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री उमा भारती यांनीही आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे आज (मंगळवार) सांगितले. तसेच येत्या काळात राम मंदिर आणि गंगा नदीच्या स्वच्छतेच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे उमा भारती म्हणाल्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात उमा भारती यांच्याकडे सध्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार आहे. उमा भारती यांच्याकडे 90 च्या दशकात राम मंदिर निर्मितीच्या प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जात होते. निवडणूक न लढविण्याबाबत उमा भारती म्हणाल्या, ''2016 मध्ये राजीनामा देणाची इच्छा व्यक्त्त केली होती. तेव्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, आता माझ्या या निर्णयावर पक्ष निर्णय घेईल. यापुढील दीड वर्ष मी राम मंदिर आणि गंगा नदीसाठी काम करणार आहे''.

दरम्यान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या उमा भारती यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने अमित शहा यावर काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Will not contest 2019 polls says BJPs Uma Bharti