

“Fraudsters used fake investigation threats to cheat an IT woman employee of ₹32 crore.”
Sakal
बंगळूर : इंदिरानगर येथील ५७ वर्षीय वरिष्ठ आयटी महिला कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत तब्बल ३१.८३ कोटी रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारीच्या आधारे पूर्व विभागातील सीईएन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्यातील ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली झालेल्या फसवणुकीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली.