
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने न्यायालयाच्या अवमाननाशी संबंधित एका प्रकरणात शेख हसीना यांना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण-१ च्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज (बुधवार) ही शिक्षा जाहीर केली. त्या बांगलादेशातून पळून येथे आल्या होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना कुठे शिक्षा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.