
आंबा, लिचीपासून बनवणार दारू; योगी सरकार करतेय तयारी
लखनौ : तुम्ही आतापर्यंत द्राक्षापासून वाईनं बनवल्याचे ऐकले असे. तुम्ही वाईनचे शौकीन असाल तर आंबा, लिची आणि बेरीपासून बनवलेली वाईनही (Wine) प्यायला मिळेल. होय हे खरं आहे. उत्तर प्रदेश सरकार आता आंब्यापासूनही दारू बनवण्याच्या तयारीत आहे. यूपीमध्ये आंबा, लिची आणि जामुनपासून दारू बनवण्यासाठी दारू कंपन्यांशी चर्चा केली जात आहे. (Wine made from mango, lychee; Yogi government is preparing)
आंबा (mango), लिची आणि जामुनपासून वाइन बनवल्यास फळांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. उत्तर प्रदेश उत्पादन शुल्क विभाग ९ जुलै रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. ज्यामध्ये मद्य उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी देखील सहभागी होतील. याचा मुख्य अजेंडा असा असेल की, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) जास्तीत जास्त फायदा मिळावा, असे उत्तर प्रदेशतील फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया सचिव राजेश कुमार सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा: एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; स्पष्टीकरण देत म्हणाले...
विशेष म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होते. दोन्ही ठिकाणी आंबा व लिचीचे (lychee) बंपर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशचा आंब्याची राज्यभर ओळख आहे. उत्तर प्रदेशात विविध प्रकारचे आंबे पिकवले जातात. ज्यांना देश-विदेशात चांगलीच मागणी आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. फळांपासून दारू बनवण्याचा मार्ग सापडला तर शेतकऱ्यांचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढेल.
Web Title: Wine Made From Mango Lychee Yogi Government Is Preparing
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..