Abhinandan : विंग कमांडर अभिनंदन म्हणताहेत, '...बाकी तुम्ही शोधून काढालंच'

wing commander abhinandan vardhamans new fresh video goes viral
wing commander abhinandan vardhamans new fresh video goes viral

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने पकडल्यानंतर पाक नागरीकांनी अभिनंदन यांच्याभोवती गर्दी केली. 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देत या घोळक्याने अभिनंदन यांच्यावर दगडफेक तर केलीच आणि हातही उगारला. पण पाकिस्तानी सैनिकांनी या गर्दीतून अभिनंदन यांना बाहेर काढले व गर्दीला आटोक्यात आणले. 

अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. ज्यात त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता. व्हिडीओत हात-पाय बांधलेले दिसत होते. डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. पण आता विंग कमांडर अभिनंदन यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात ते चहा पितांना दिसत आहेत. त्यांच्या जखमाही दिसत नाही आहेत. या व्हिडीओत ते चहा पित पाकिस्तानी सैनिकांसोबत बोलत आहेत. 

व्हिडीओत पाक सैनिक अभिनंदन यांना नाव-गाव-पत्ता विचारत आहेत. ज्यावर अभिनंदन यांनी केवळ नाव व मी दक्षिण भारतीय आहे एवढेच सांगितले आहे. 'मला खात्री आहे बाकी तुम्ही शोधून काढालंच...' असे म्हणत 'सॉरी मेजर मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकत नाही' असे स्पष्ट केले आहे. 

पाकिस्तानी सैनिकाने अभिनंदन यांना विवाहीत आहे का? हा प्रश्न केल्यानंतर त्यांनी 'हो' असे उत्तर दिले आहे. याशिवाय 'पाकिस्तानी आर्मीने मला नागरीकांच्या घोळक्यातून बाहेर काढले. पाकिस्तानी आर्मीचे अधिकाऱ्यांनी मला खूप चांगली वागणूक दिली आहे आणि मी माझ्या मायदेशी परतल्यानंतरही माझ्या म्हणण्यावर ठाम राहील. '

 


 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com