The proposed delimitation bill linked to women's reservation is likely to be a key issue in the upcoming Winter Session of Parliament.
esakal
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात महिला आरक्षणाशी संबंधित मतदारसंघ फेररचना विधेयक मंजूर करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न राहू शकतो, अशी माहिती रविवारी सूत्रांनी दिली. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणीच्या (एसआयआर) मुद्द्यावरून काही काळापासून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल चालवला आहे. या पार्श्वभूमीवर, हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.