Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; या मुद्द्यांवर होणार चर्चा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; या मुद्द्यांवर होणार चर्चा
Parliament Winter Session 2023
Parliament Winter Session 2023 eSakal

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये चार राज्यांच्या निकालानंतर आज दुसऱ्याच दिवशी होत असलेल्या अधिवेशनाकडं सर्वांच लक्ष लागले आहे.

आज (सोमवार) सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संसदेच्या बाहेरून अधिवेशन सुरळीत पार पडाव यासाठी संबोधित करणार आहेत. दरम्यान आज पहिल्याच दिवशी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाचा एथिक्स कमिटीचा रिपोर्ट अध्यक्षांसमोर सादर केला जाणार आहे.

संसदेच्या 19 दिवसांच्या या अधिवेशनात 15 बैठका होणार असून 37 विधेयके मांडली जाणार आहेत. IPC, CrPC आणि एविडेंस अॅक्ट यात बदल करणारी तीन विधेयक अधिवेशनात पारीत होण्याची शक्यता देखील आहे. पावसाळी अधिवेशनावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी ती लोकसभेत मांडत स्टॅडींग कमिटीकडे पाठवली होती. अनेक मिटिंग नंतर 10 नोव्हेंबरला कमिटीने आपला रिपोर्ट सादर केला होता.

Parliament Winter Session 2023
Uddhav Thackeray "...आमच्यासाठी हा चांगला इशारा"; भाजपच्या विजयावर ठाकरेंनी अशी का दिली प्रतिक्रिया?

या सोबतच मुख्य निवडणुक आयुक्त आणि बाकी निवडणुक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात देखील विधेयक मांडले जाणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची अधिवेशनातील रणणीती बाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात बैठक होणार आहे.

Parliament Winter Session 2023
गावात बालविवाह झाल्यास ग्रामसेवक होणार निलंबीत? अल्पवयीन मुलींच्या स्वप्नांचा चुराडा थांबणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com