
संसदेचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरला सुरू झालं आणि आज संपलं. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून लोकसभा आणि राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. अगदी धक्काबुक्कीच्या घटनाही घडल्या आणि आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली. भाजपचे दोन खासदार जखमी झाले. राहुल गांधींविरोधात गुन्हाही दाखल झाला. पण या सगळ्यात १८ व्या लोकसभेत आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये सर्वात कमी कामकाज झालंय.