विप्रो 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार लस; जूनपासून लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विप्रो 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार लस; जूनपासून लसीकरण

कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी जूनच्या सुरुवातीला लसीकरण (Vaccination) मोहिम सुरु करण्यात येईल असं विप्रोकडून सांगण्यात आलं आहे.

विप्रो 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार लस; जूनपासून लसीकरण

बेंगळुरु - आयटी कंपनी विप्रोने (Wipro) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 लाख डोस मिळण्याची आशा व्यक्त केली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी जूनच्या सुरुवातीला लसीकरण (Vaccination) मोहिम सुरु करण्यात येईल असं विप्रोकडून सांगण्यात आलं आहे. कंपनीने म्हटलं की, भारतातील (India) कर्मचाऱ्यांना कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीकरणासाठी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य सेवेसाठी ऑनलाइन टू ऑफलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मशी पार्टनरशिप केली आहे. (wipro-covid-19-vaccinate-100-000-employees-starting-june-report)

कंपनीला कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांसाठी पहिल्या टप्प्यात तीन लशींचे एकूण 1 लाख डोस मिळतील अशी शक्यता आहे. यामध्ये कोवीशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीचा समावेश आहे.

हेही वाचा: तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचार प्रकरणातून निर्दोष मुक्तता

विप्रोकडून ही लसीकरण सेवा मोफत असणार आहे. तसंच देशातील कंपनीच्या कॅम्पस आणि पार्टनर असलेल्या रुग्णालयांकडून लसीकरण मोहिम राबवली जाईल. देशभरातील एकूण 140 सेंटर्समधून ही लस देण्यात येणार आहे.

loading image
go to top