esakal | सहा महिन्यात किती टक्के मुंबईकर झाले 'बाहुबली'? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

सहा महिन्यात किती टक्के मुंबईकर झाले 'बाहुबली'? वाचा सविस्तर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. "कोरोनाला रोखणारी लस ही बाहुवर म्हणजेच हातावर घेतली जाते. त्या लसीमुळे कोरोनाला रोखण्याची प्रतिकारक शक्ती आपल्या शरिरात येते. त्यामुळे सर्वांनी लस घ्या आणि बाहुबली व्हा", असा संदेश मोदींनी दिला. मुंबईतील लसीकरण मोहिमेला आता सहा महिने पूर्ण झाले. त्यानिमित्ताने नक्की किती मुंबईकर 'बाहुबली' झाले याची आकडेवारी समोर आली. या लसीकरण मोहिमेला मुंबईकरांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असला तरी पालिकेच्या आकडेवारीनुसार, पहिला डोस जवळपास 55 टक्के नागरिकांनी घेतला, तर दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या सुमारे 15 टक्के इतकीच आहे. (Mumbai BMC says around 15 percent people fully vaccinated and 55 percent got 1st dose In last six months to become Bahubali)

हेही वाचा: ITI प्रशिक्षणाला परवानगी पण लोकल प्रवासाची मुभा नाहीच!

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,  आतापर्यंत एकूण 65 लाख 24 हजार 841 लोकांना कोरोनाचा डोस मिळाला आहे. त्यापैकी 14 लाख 96 हजार 496 मुंबईकरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर, 50 लाख 28 हजार 343 मुंबईकरांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. 15 लाखांपैकी 18 वर्षांवरील 70 हजार 055 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर, 45 वर्षांवरील 11  लाख 36 हजार 943 नागरिकांना आणि 60 वर्षांवरील 5 लाख 58 हजार 740 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

हेही वाचा: Corona : दोन्ही डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून 99 टक्के बचाव

या व्यतिरिक्त, 2 लाख 80 हजार 554 फ्रंट लाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, कोरोनाविरूद्ध युद्ध लढणाऱ्या पहिल्या फळीतील फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांपैकी 50 टक्के कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच मिळाले आहे.

हेही वाचा: घरोघरी लसीकरण चांगलं, पण एका डोसमागे ९ डोस वाया जाणार का?

दरम्यान, तिसऱ्या लाटेपूर्वी किमान 70 टक्के लसीकरण करण्याचे पालिकेसमोर आवाहन असून लसींच्या अभावांमुळे हा टप्पा गाठणं कठीण होईल असे एकूणच परिस्थितीवरुन दिसत आहे. 16 जानेवारी या दिवशी सुरू झालेल्या या लसीकरणाच्या मोहमिअंतर्गत आतापर्यंत फक्त 15 लाख नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहे. आतापर्यंत कोविशिल्डचे 61,06,235 / कोव्हॅक्सिनचे 4,10,302 तर स्पुटनिकचे 8,304 डोस मुंबईकरांनी घेतले आहेत.

loading image