भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप; डीएनए टेस्टसाठी तयार

टीम ई सकाळ
Sunday, 23 August 2020

भारतीय जनता पक्षाचे (BJP) उत्तराखंडचे (Uttarakhand) आमदार महेश नेगी (MLA Mahesh Negi) यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पिडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून महिलेने महेश नेगी यांनी डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) उत्तराखंडचे (Uttarakhand) आमदार महेश नेगी (MLA Mahesh Negi) यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पिडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून महिलेने महेश नेगी यांनी डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उडी घेतली असून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी म्हटले आहे की, महेश नेगी हे त्यांची डीएनए टेस्ट करण्यासाठी तयार आहेत. पिडित महिलेने एक व्हिडिओ जारी करून सांगितले होते की, भाजप आमदारांसोबत मागील दोन वर्षापासून शारिरिक संबंध होते. तिच्या मुलीचा डीएनए तिच्या पतीच्या डीएनएशी मॅच होत नाही, त्यामुळे तिचा डीएनए आमदाराच्या डीएनएसोबत मॅच होईल असे पिडित महिलेचे म्हणणे आहे. मुलीच्या भविष्यासाठी महेश नेगी यांची डीएनए टेस्ट करावी अशी मागणी या महिलेने केली आहे.

पिडित महिलेने नेहरू कॉलनी पोलिस स्थानकांमध्ये फिर्याद दाखल केली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीत आमदाराने २०१६पासून तिच्यासोबत नैनीताल, दिल्ली, मसूरी आणि देहराडून अशा वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला आहे. महिलेने पुढे म्हटले आहे की, ती आपल्या आईच्या दवाखान्यासंबधी कामासाठी आमदारांना भेटली होती, असे फिर्यादी महिलेने म्हटले आहे. मात्र, आमदार महेश नेगी यांच्या पत्नी रिता यांनी महिलेने पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यासाठी हा पर्याय निवडला असल्याचे म्हटले आहे. रीता नेगी (Reeta Negi)यांनीही महिलेवर गंभीर आरोप केले असून त्यांनीही नेहरू कॉलनी पोलिस स्थानकांमध्ये फिर्याद दिली आहे. रीता यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या पतीला बदनाम करण्यासाठी हा एक कट रचण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासोबतच महिलेने पाच कोटी रुपये त्यांच्या पतीकडे मागितले असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणानंतर राज्याचे पोलिस महासंचालक अशोक कुमार (Ashok Kumar) यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान या प्रकरणाला राजकीय रंग आला असून प्रदेश कांग्रेस (Congress) अध्यक्ष प्रीतम सिंह (Pritam Singh) यांनी या प्रकरणात उडी घेत हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हणत त्या मुलीच्या डीएनए टेस्टची मागणी केली आहे. प्रीतम सिंह म्हणाले, हा एक गंभीर विषय असून एक महिला एका लोकप्रतिनीधावर बलात्काराचा आरोप करत आहे. यातून एका मुलीचा जन्म झाला असून त्या आमदाराची लवकरात लवकर डीएनए टेस्ट करण्यात यावी, जेणेकरून सत्य लवकर बाहेर येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman alleging rape by Uttarakhand MLA Mahesh Negi