पतीला झाडाला बांधून पत्नी, मुलीवर अत्याचार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

गया : पतीला झाडाला बांधून त्याच्यासमोरच त्याची पत्नी आणि मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची भीषण घटना बिहारमधील कूंच भागात घडली. बुधवारी रात्री उशीरा घडलेली ही घटना काल (गुरुवार) उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती, पत्नी आणि मुलगी असे तिघे जण बाईकवरून बुधवारी रात्री प्रवास करत होते. नऊ जणांच्या टोळक्‍याने त्यांचा रस्ता अडविला. त्या टोळक्‍याने या कुटुंबाकडील दोन हजार रुपये आणि दागिने हिसकावून घेतले आणि पतीला झाडाला बांधून ठेवले. त्याची 45 वर्षांची पत्नी आणि 14 वर्षांच्या मुलीवर तिघांनी अत्याचार केला. 

याच गुन्हेगारांनी यापूर्वीही दोन इतर दुचाकीस्वारांना अशाच पद्धतीने लुटले होते. माहिती मिळताच गयाचे पोलिस उपनिरीक्षक राजीव मिश्रा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत 20 संशयितांना ताब्यात घेतले. 'नऊपैकी सहा जणांनी चेहरे झाकले होते. उर्वरित तिघांपैकी दोघांना पीडितांनी ओळखले आहे. त्यांना अटक करण्यासाठी शोध सुरू आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: woman and her daughter gang raped in Bihar