आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडंल अन्...

Woman and her partner kill son after he sees them in objectional position in New Delhi
Woman and her partner kill son after he sees them in objectional position in New Delhi

नवी दिल्ली: आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर तिघांमध्ये वादावादी झाली. आईने प्रियकराच्या मदतीने मुलाचा खून केल्याची घटना न्यू अशोक नगर परिसरामध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदर पाठव हा उत्तर प्रदेशातील खरैया गावचा रहिवाशी आहे. नुकताच तो आई सोबत कामाच्या निमित्ताने दिल्लीत आला होता. नोएडा येथे तो चालकाचे काम करत होता. शनिवारी (ता. 26) तो रात्रपाळी करून घरी आला. यावेळी आई व अजित नावाच्या व्यक्तीला नको त्या अवस्थेत त्याने पाहिले. यामुळे तिघांमध्ये जोरदार भांडण झाले. आईने अजितच्या मदतीने रविंदरचा खून केला. रात्रभर रविंदरचा मृतदेह तिने खोलीमध्येच ठेवला. रविंदरचा अपघाती मृत्यू झाल्याचे तिने प्रथम भासविण्याचा प्रयत्न करून रुग्णवाहिका बोलवली. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याला संशय आला आणि त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यानंतर आरोपी आई व अजित घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्तानं माखलेली वीट ताब्यात घेतली. शिवाय, रविंदरचा मृतदेह घेतला.

रविंद्रचे दोन भाऊदेखील येथेच वास्तव्यास होते. त्याचे वडील गावामध्ये चार मुलींसोबत राहत आहेत. तीन मुली विवाहित आहेत. दहा मुलांची आई असलेली आरोपी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून पळून जावयाच्या घरी गेली होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com