पती अन् चार मुलांपेक्षा तूच आवडतो...

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

मला माझा पती आणि माझ्या चार मुलांपेक्षा तुच जास्त आवडतो, असे म्हणून विवाहितेने विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले.

अग्रा (उत्तर प्रदेश): मला माझा पती आणि माझ्या चार मुलांपेक्षा तुच जास्त आवडतो, असे म्हणून विवाहितेने विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. दोघांनी मिळून पतीचा खून केला आणि मृतदेह नदी फेकून दिला. पोलिसांनी दोघांना अटक केली.

सिकंदरा येथील राधा नगरमध्ये वास्तव्यास असणारे हरिओम सिंह बेपत्ता होते. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपास सुरू केल्यानंतर हरिओम यांची पत्नी बबलीवर संशय आला. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह यमूना नदीत फेकून दिल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी बबली व तिचा प्रियकर कमलला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिओम (वय 36) व बबलीचा 17 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोघांना चार मुले आहेत. विक्रेता असलेल्या कमलसोबत बबलीचे प्रेम सुरू झाले. याबाबतची माहिती हरिओमला समजली होती. आपल्या प्रेमाबद्दल पतीला समजले आहे, पण मला पती व मुलांपेक्षा तुच आवडतो. मला तुझ्यासोबतच राहायचे आहे, असे बबली कमलला म्हणाली. दोघांनी मिळून हरिओमचा गळा दाबून खून केला व मृतदेह नदीत फेकून दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman arrested with her boyfriend for murder of husband in agra