'स्वाती मालीवाल बोलतेय, माझ्यासोबत सीएम हाऊसमध्ये हाणामारी...', दिल्ली पोलिसांना आला फोन, तपास सुरू

आज (सोमवारी) सकाळी 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून दिल्ली पोलिसांना दोन पीसीआर कॉल करण्यात आले. फोन करणाऱ्याने महिलेने स्वाती मालीवाल असल्याचे सांगितले. सीएम हाऊसमध्ये हाणामारी झाल्याचा देखील त्यांनी सांगितलं नाही.
Swati Maliwal
Swati MaliwalEsakal

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी खळबळजनक आरोप केल्याचा दावा दिल्ली पोलिसांशी संबंधित सूत्रांनी केला आहे. सीएम हाऊसमधून दिल्ली पोलिसांना पीसीआर कॉल करण्यात आल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख स्वाती मालीवाल अशी करून दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या ऑपरेशन सेलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कथित घटनेबाबत दोन कॉल आले होते. सकाळी ९.४० च्या सुमारास पहिला कॉल आला. पहिल्या कॉलमध्ये नाव उघड केले नाही. पण पुन्हा एकदा सकाळी ९.५४ च्या सुमारास दुसरा कॉल आला. कॉलरने पोलिसांना सांगितले की महिलेचे नाव स्वाती मालीवाल आहे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा सहकारी विभव कुमार त्यांच्यासोबत हाणामारी केली.

Swati Maliwal
S. Somanath : अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार ; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत

लेखी तक्रार दिलेली नाही

घटनेची माहिती मिळताच परिसरातील पोलिसांच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पोलिस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आत गेले नाहीत. या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता स्वाती तेथे आढळून आल्या नाहीत. प्रोटोकॉलनुसार दिल्ली पोलीस सीएम हाउसच्या आत जाऊ शकत नाहीत. पीसीआर कॉलची सत्यता जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणतीही लेखी तक्रार देण्यात आलेली नाही. या प्रकरणी स्वाती मालीवाल यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मालिवाल यांच्याबाबत दिल्ली पोलिसांच्या या दाव्यानंतर भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे.

Swati Maliwal
Polling Agents: थरार पोलिंग एजंट्सच्या अपहरण अन् सुटकेचा; आमदाराने लगावली मतदाराच्या कानशिलात

भाजपने प्रत्युत्तर दिले

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, अरविंद केजरीवाल हे केवळ उघडपणे बेईमान नाहीत तर ते महिलांशी गैरवर्तन करतात आणि गुंडगिरी करतात. आज राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांच्या पीएने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याची तक्रार केली आहे. एवढा अभ्यास करून काय उपयोग, मुख्यमंत्री केजरीवाल, तुम्ही महिलांचा आदर करायलाही शिकला नाही.

Swati Maliwal
Motorcycle Fire Blast: बुलेटला लागलेली आग विझवताना झाला स्फोट, १० जण होरपळले.. अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी या कथित घटनेबाबत अफवा रोखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. सूत्रांचा हवाला देऊन त्यांनी दावा केला की, सोमवारी सकाळी ९.१५ वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचे सहकारी आणि ज्येष्ठ महिला नेत्यामध्ये हाणामारी झाली. पोलिसांनाही फोन केल्याचे त्यांनी सांगितले. ही गंभीर बाब असल्याचे सांगून कपूर म्हणाले की, माजी महिला अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरक्षित नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे.

Swati Maliwal
CBSE 12th result : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर! कुठे पाहता येईल? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com