Motorcycle Fire Blast: बुलेटला लागलेली आग विझवताना झाला स्फोट, १० जण होरपळले.. अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Hyderabad Motorcycle Fire Blast: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक मोटरसायकलला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Hyderabad Motorcycle Fire Blast
Hyderabad Motorcycle Fire BlastEsakal

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक मोटरसायकलला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, दुचाकीचा स्फोट होऊन १० जण जखमी झाले आहेत. हा व्हिडिओ हैदराबादचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

द प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, हैदराबादमध्ये दुचाकीचा स्फोट होऊन सुमारे दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावरही शेअर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुगलपुरा येथील बीबी बाजार रोडवर रविवारी दुपारी ही घटना घडली. रस्त्याच्या मधोमध दुचाकीचा स्फोट होऊन एका पोलीस हवालदारासह दहा जण गंभीर जखमी झाले.

Hyderabad Motorcycle Fire Blast
Uddhav Thackeray Interview: महाराजांनी सूरत लुटली आणि मोदी शहांनी शिवसेना लुटली.. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र लुटीची आकडेवारीच सांगितली

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती आपली रॉयल एनफिल्ड बाईक घेऊन बीबी बाजारमध्ये पोहोचताच त्यांना त्याच्या बाईकला आग लागल्याचे दिसले. आगीपासून वाचण्यासाठी त्याने दुचाकीवरून उडी मारली. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी दुचाकीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी इतर लोकांसह एक पोलीस हवालदारही तेथे होता. आग विझवण्यासाठी लोक पाणी टाकत होते. या घटनेत अनेक जण जखमी झाले.

Hyderabad Motorcycle Fire Blast
Loksabha Election : मतदानाचा टक्का वाढणार का? ; चौथ्या टप्प्यात ९६ मतदारसंघांमध्ये आज मतदान

एक व्यक्ती आग विझवण्यासाठी बाईकवर सॅकही आपटतो असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आग विझवण्यासाठी लोक शर्थीचे प्रयत्न करत असताना अचानक बाईकचा स्फोट झाला. यावेळी शेजारी उभे असलेले काही जण जखमी झाले. तर काहीलोक जीव वाचवण्यासाठी लांब धावू लागले.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल

व्हिडिओमध्ये लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. आगीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जिथे त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Hyderabad Motorcycle Fire Blast
CBSE 12th result : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर! कुठे पाहता येईल? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com