
मुझफ्फरपूरच्या पारू पोलीस स्टेशन परिसरातील सिमरी गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिथे एका महिलेने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुरूषाचा गुप्तांग ब्लेडने कापल्याचे दिसून आले आहे. यानंतर जखमी पुरूषाला गंभीर अवस्थेत एसकेएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.