धक्कादायक! डॉक्टर नसल्याने कंपाऊंडरने केलं नसबंदीचे ऑपरेशन; 28 वर्षीय महिलेचा मृत्यू

compounder does surgery: एका खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्याने कंपाऊंडरने महिलेचे नसबंदीचे ऑपरेशन केले
operation
operation

पाटना- वैद्यकीय निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्याने कंपाऊंडरने महिलेचे नसबंदीचे ऑपरेशन केले. दुर्दैव म्हणजे यात या महिलेचा मृत्यू झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.(Woman dies as compounder does surgery in absence of doctors in Bihar)

बबिता देवी या २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. यादरम्यान कंपाऊंडर घटनास्थळावरुन पसार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला राजधानी पाटनापासून ८० किलोमीटर दूर मुसरीघरारी या गावातील रहिवाशी आहे. महिलेला अनिषा हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

operation
Nashik Crime News : अवैध धंद्यांविरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई; आचारसंहितेच्या महिनाभरात 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

सुरुवातीला कंपाऊंडर आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांना सांगितलं की सध्या डॉक्टर नाहीत. त्यानंतर काही वेळाने कंपाऊंडरने कुटुंबियांना समजावलं की, तो देखील सर्जरी करु शकतो. त्यानंतर सर्जरीला सुरुवात केली, असं मुसरीघरारी पोलीस स्टेशनचे प्रभारी फैजुल अन्सारी यांनी सांगितलं.

महिलेला सकाळी अकरा वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं होतं. पण, एक तासानंतर महिलेची स्थिती बिघडली. त्यानंतर तिला तातडीने दुसऱ्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे हॉस्पिटल पहिल्या हॉस्पिटलपासून १० किलोमीटर दूर होते. यादरम्यान कुटुंबियांची परवानगी घेण्यात आली नव्हती. महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह पहिल्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला, असं अन्सारी म्हणाले.

operation
Navi Mumbai Crime: बेकायदेशीर वास्तव्य; १२ परदेशी नागरिकांची धरपकड, मूळ देशात पाठविण्याची कार्यवाही सुरू

कुटुंबियांना जेव्हा महिलेच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा ते आक्रमक झाले. त्यांनी अनिषा हेल्थ केअरच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात केली. हॉस्पिटलचे मालक व डॉक्टर ज्याने सर्जरी करायला हवी होती तो आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केलीये. अन्सारी यांनी सांगितलंय की, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Crime News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com