सेक्स रॅकेटवर छापा टाकताच युवतींच्या उड्या अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

वाराणसी शहरामधील संजयनगर कॉलनीमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटवर छापा टाकल्यानंतर तीन युवतींनी उड्या मारल्या. यामध्ये एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून, दोघीजणी जखमी झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाराणसी (उत्तर प्रदेश): वाराणसी शहरामधील संजयनगर कॉलनीमध्ये पोलिसांनी सेक्स रॅकेटवर छापा टाकल्यानंतर तीन युवतींनी उड्या मारल्या. यामध्ये एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून, दोघीजणी जखमी झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...

पोलिस अधिकारी प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयनगर मधील एका घरामध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. रात्रीच्या सुमारास संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. यामुळे घाबरलेल्या तीन युवतींनी बाहेर उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. इमारतीवरून खाली पडल्यामुळे एका युवतीचा जागीच मृत्यू झाला तिचे वय 28 आहे. दोघी जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय, तीन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरून विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये पासपोर्ट आढळून आले आहेत. या पासपोर्टवरून युवती परदेशातील असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पुढील तपास करत आहोत.

वहिणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले म्हणून...

दरम्यान, संजयनगरमधील घर हे पप्पू सिंह यांचे आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाड्याने दिले होते. या घरामधील वातावरण संशयास्पद वाटल्यामुळे स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. शिवाय, वाहनांवरून स्थानिकांमध्ये वाद झाले होते.

परदेशी कॉलगर्लच्या मोबाईलमध्ये मिळाले अनेक नंबर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman falls to death during police raid at varanasi