
Nora Fatehi Case: अभिनेत्री नोरा फतेहीसारखी पत्नी दिसावी, तिच्यासारखं सुडौल शरीर व्हावं यासाठी पतीने छळ केल्याची घटना समोर आलीय. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं ही घटना घडली आहे. मुरादनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं या प्रकरणी पतीविरोधात तक्रार दाखल केलीय. पती दररोज टोमणे मारतो आणि नोरा फतेहीसारखं दिसावं यासाठी तीन-तीन तास जिममध्ये एक्सरसाइज करायला लावायचा असं पत्नीने म्हटलंय. पीडीत महिला एक फिजिकल एज्युकेशन टीचर आहे. महिलेनं आरोप केला की, तिची उंची आणि सौंदर्य सामान्य आहे. पण पती त्यावरून दररोज टोमणे मारायचा. चुकीच्या व्यक्तीशी लग्न केलं असं म्हणायचा.