पतीसमोरच सामूहिक बलात्कार अन् मोबाईलवरून शुटींग

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

पाच जणांनी आम्हाला आडवल्यानंतर रस्त्याच्या बाजूला घेऊन गेले. पतीला त्यांनी बेदम मारहाण केली. आमच्या दोघांचीही कपडे काढल्यानंतर त्यांनी पती समोरच माझ्यावर सामूहिक बलात्कार केला.

अल्वर (राजस्थान): येथील महामार्गावर पतीसमोर महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार करण्यात आला असून, बलात्कार करत असताना मोबाईलवर शुटींग करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. बलात्कार प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसून, या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.

अल्वर जिल्ह्यात राहणारी विवाहीत महिला 26 एप्रिल रोजी पतीसोबत दुचाकीवरून चालली होती. थानागाजी-अल्वर मार्गावर पाच युवकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. एका ठिकाणी त्यांना आडवल्यानंतर चाकूचा धाक दाखवून निर्जनस्थळी नेले. महिलेवर पतीसमोरच पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी त्यांनी या घटनेचे मोबाईलधून व्हिडिओ शुटिंग तयार केले. याबाबत कोठे वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याबरोबरच ठार मारण्याची धमकी दिली. या दांपत्याने भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दिली नाही. मात्र, यानंतरही त्यांनी पीडित महिलेच्या पतीला मोबाईलवरून धमकी देणे सुरुच ठेवले. अखेर सोमवारी (ता. 6) पीडितेने पोलिस ठाणे गाठले आणि सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'पाच जणांनी आम्हाला आडवल्यानंतर रस्त्याच्या बाजूला घेऊन गेले. पतीला त्यांनी बेदम मारहाण केली. आमच्या दोघांचीही कपडे काढल्यानंतर त्यांनी पती समोरच माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधम एकमेकांना छोटेलाल उर्फ सचिन, जीतू आणि अशोक या नावाने हाक मारत होते. जवळपास अडीच तास महामार्गाजवळ हा सर्व प्रकार सुरू होता. सामूहिक बलात्कारानंतर त्यांनी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.' दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अपहरण, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman gang raped by five youths in Alwar rajasthan