बलात्कारापासून वाचण्यासाठी बाल्कनीतून उडी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

रविवारी रात्री घराकडे परतत असताना आरोपींपैकी एकजण ओळखीचा असल्याने त्याने घराकडे सोडतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने मुनिरका भागातील पांडव नगर येथील घरी नेऊन माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या अन्य मित्रांना बोलविण्यापूर्वी मी बाल्कनीतून उडी घेतली .

नवी दिल्ली - पूर्व दिल्लीत एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या पाच जणांपासून वाचण्यासाठी महिलेने बाल्कनीतून उडी घेत स्वतःला वाचविले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाने या महिलेला घरी सोडण्याचे नाटक करून त्याच्या रुमवर नेऊन खोलित डांबून ठेवले. त्याठिकाणी त्याच्या चार मित्रांना बोलविले. पण, त्यापूर्वीच बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलेने पहिल्या मजल्याच्या बाल्कनीतून खाली उडी मारली. यामुळे तिच्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. आरोपींपैकी तिघेजण नोएडात बीपीओमध्ये नोकरी करत आहेत. तर, एक जण फायनान्स कंपनीत आहे आणि एक बेरोजगार आहे. पीडीत महिलेचा घटस्फोट झाला असून, ती घरकाम करते.

रविवारी रात्री घराकडे परतत असताना आरोपींपैकी एकजण ओळखीचा असल्याने त्याने घराकडे सोडतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने मुनिरका भागातील पांडव नगर येथील घरी नेऊन माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या अन्य मित्रांना बोलविण्यापूर्वी मी बाल्कनीतून उडी घेतली व तेथून पळाल्याचे, या महिलेने पोलिसांना सांगितले.

Web Title: Woman gangraped by 5 in Delhi, jumps off balcony to escape