महिलेने दिला चार अपत्यांना जन्म

पीटीआय
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

चार अपत्यांना जन्म देणे शारिरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण काम आहे. त्यांची सुरक्षित प्रसूती करणे अत्यंत आव्हानात्मक काम असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

धनबाद (झारखंड) - येथील एका खाजगी रुग्णालयात एका महिलेने एकाच वेळी चार अपत्यांना जन्म दिला आहे. अपत्यांमध्ये तीन मुले असून एका मुलीचा समावेश आहे.

येथील लक्ष्मी नारायण सेवा सदन रुग्णालयात कुंती रावनी (वय 25) ही गर्भवती महिला दाखल झाली होती. सोमवारी तिने एकाच वेळी चार अपत्यांना जन्म दिला आहे. कुंती आणि तिच्या अपत्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्‍टर पी बी मंडल आणि शेखर कुमार यांनी दिली. नवजात अपत्ये रुग्णालयात देखरेखीखाली आहेत. चार पैकी तीन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांचे वजन अनुक्रमे 1.3 किग्रॅ, 1.2 किग्रॅ, 1.05 किग्रॅ आणि 1.15 किग्रॅ आहेत. पहिले अपत्य बाहेर आल्यानंतरही वेदना होत असल्याचे प्रसूती करणाऱ्या डॉक्‍टरांना आश्‍चर्य वाटले.

'कुंतीच्या प्रकृतीमध्ये सुरुवातीपासूनच कोणतेही असामान्य लक्षणे आढळून आले नाहीत. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनाही आश्‍चर्य वाटले', अशा प्रतिक्रिया कुंतीच्या पतीने व्यक्त केल्या. कुंतीचे पती मजूर आहेत. चार अपत्यांना जन्म देणे शारिरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण काम आहे. त्यांची सुरक्षित प्रसूती करणे अत्यंत आव्हानात्मक काम असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Woman gives birth to quadruplet