
कर्नाटकामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला तिचा पती, मुले, सासू आणि सासऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी ती त्यांना हळूहळू विष देत होती. पतीला तिच्या बॅगेत काही गोळ्या सापडल्या तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पती गोळ्या घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याला सांगितले की या गोळ्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहेत.