Honeytrap: महिलेने माझ्यासोबत...; आत्महत्येनंतर लिंगायत महंतांची धक्कादायक सुसाईड नोट सापडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lingayat mahants

Honeytrap: महिलेने माझ्यासोबत...; आत्महत्येनंतर लिंगायत महंतांची धक्कादायक सुसाईड नोट सापडली

बंगळुरू - लिंगायत संप्रदायाचे महंत बसवसिंग स्वामी यांनी सोमवारी कर्नाटकच्या रामनगर येथील कंतुगल मठात आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. महंत बसवसिंग यांच्या आत्महत्येबाबत आता धक्कादायक बाब समोर आली असून त्यांनी हनीट्रॅपमुळे जीवन संपवल्याचं उघड झालं आहे.

हेही वाचा: नोटांवर गांधींसोबत लक्ष्मी-गणेशाचा फोटो असावा; केजरीवालांच्या मागणीवर भाजपचा पलटवार म्हणालं, मतांसाठी धर्माचं..

एका महिलेने त्यांना अश्लिल व्हिडीओ कॉल केला होता. त्यानंतर महिलेकडून महंतांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. महंतांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ही बाब समोर आली आहे. शिवाय सुसाईड नोटमध्ये मठातील दोन व्यक्तींची नावं असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेने महंतांना व्हिडीओ कॉल करून आपल्या फोनवर स्क्रीन रेकॉर्डींग केलं. या संदर्भात महंतांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं की, एका अनोळखी महिलेने आपल्यासोबत वाईट कृत्य केलं.

हेही वाचा: Target Killing : टार्गेट किलिंगच्या भीतीने काश्मिरी पंडितांनी सोडलं गांव

पोलिसांनी सांगितलं की, महिलेसह चार लोकांनी महंतांना अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. हे चार लोक कोण याची माहिती आमच्याकडे असल्याचं पोलिसांनी म्हटलं.

महंत बसवलिंग स्वामी कंतुगल मठाचे प्रमुख महंत होते. महंतांनी मृत्यूपूर्वी दोन पानाची सुसाईडनोट लिहिली आहे. त्यामुळे आपलं लैंगिक शोषण करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आरोपी महंत बसवसिंग यांना त्यांच्या पदावरून हटवू पाहात होते. बसवसिंग हे मागील २५ वर्षांपासून मठाचे प्रमुख महंत होते.

टॅग्स :KarnatakacrimeCrime News