आधुनिक हिरकणी! बाळाला पाठीशी बांधून गावोगाव करते लसीकरण

पाठीशी बाळ आणि हातात लसीकरण कीट; सोशल मीडियावर होते महिलेची चर्चा
आधुनिक हिरकणी! बाळाला पाठीशी बांधून गावोगाव करते लसीकरण

कोरोना विषाणूचा coronavirus वाढता प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लस घेण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. मात्र, अद्यापही या विषाणूवर कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लस मात्र उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सोबतच साथीचे रोग पसरु नयेत म्हणून लहान मुलांनचंदेखील लसीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनेक राज्यांमध्ये आरोग्य कर्मचारी खेड्यापाड्यात जाऊन नागरिकांचं लसीकरण करत आहेत. यामध्येच सध्या झारखंडमधील एका महिलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे तिच्याकडे पाहिल्यानंतर ती आजच्या काळातील आधुनिक हिरकणीच असल्याचं म्हटलं जात आहे. (woman-health-worker-carrying-toddler-wading-through-river-photo-goes-viral)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो झारखंडमधील मानती कुमारी यांचा आहे. या फोटोमध्ये मानती कुमारी आपल्या दीड वर्षाचा बाळाला पाठीशी बांधून नदीतून चालत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एका हातात लशींचा बॉक्स आणि पाठीवर लहान बाळाला बांधलं आहे. गावातील लहान मुलांना साथीच्या रोगांचं लसीकरण करण्यासाठी त्या इतकी पायपीट करत असल्याचं सांगण्यात येतं.

आधुनिक हिरकणी! बाळाला पाठीशी बांधून गावोगाव करते लसीकरण
कधी मित्राच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात पडलात का?

'टाइम्स ऑफ इंडिया'नुसार, मानती कुमारी चेतमा आरोग्य केंद्रात एएमएम आहेत. त्या प्रत्येक महिन्यात अक्सी पंचायतमधील गावांमध्ये लहान मुलांना लस देण्यासाठी जातात. परंतु, यावेळी पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्यांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला.

दरम्यान, काही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मते त्या गावी जाण्यासाठी नदीऐवजी अन्य मार्गदेखील होते. मात्र, मानती कुमारी यांनी नदीचा मार्ग स्वीकारला. तसंच, जर काही समस्या असतील तर आपल्या वरिष्ठांसोबत चर्चा केली पाहिजे असं मत काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com