भाजप आमदाराची महिला 'आयपीएस'वर अरेरावी

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

अग्रवाल चारू निगम यांच्याकडे बोट करून ''मी तुमच्याशी बोलत नाही. मला तुम्ही काही सांगू नका. शांत बसा तुम्ही. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका,'' असे बोलत आहेत.

गोरखपूर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदाराने महिला आयपीएस अधिकाऱ्याला भररस्त्यात आरडाओरड केल्याने तिला अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदारावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

कोहिवा गावातील महिलांनी दारुची दुकाने बंद करण्याबाबत रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. यावेळी महिलांनी आयपीएस महिला अधिकारी चारु निगम यांच्यावर जबरदस्तीने हटविल्याचा आरोप केला. तसेच एका महिलेला मारहाण केल्याची आणि वृद्धाला ढकलल्याचा आरोप केला. त्यावेळी घटनास्थळी आलेले भाजप आमदार राधा मोहनदास अग्रवाल यांनी या आयपीएस अधिकाऱ्याला जोरदार फटकारले.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की अग्रवाल चारू निगम यांच्याकडे बोट करून ''मी तुमच्याशी बोलत नाही. मला तुम्ही काही सांगू नका. शांत बसा तुम्ही. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका,'' असे बोलत आहेत. या सर्व घटनेनंतर चारू निगम यांना अश्रू अनावर झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. 

Web Title: Woman IPS officer in tears after UP BJP MLA pulls her up publicly