Belgaum : पती आईपासून विभक्त होत नव्हता म्हणून सुनेनं सासूचा केला खून; डोक्यात रॉडने हल्ला

मेहरून्नीसा हिचा बैलहोंगल येथील सुबान याकुशी याच्यासोबत विवाह झाला होता.
Crime News
Crime Newsesakal
Updated on
Summary

पतीने दुसरे घर बांधावे, असे मेहरून्नीसाला वाटत होते; पण सुबान आईपासून विभक्त होण्याच्या तयारीत नव्हता.

बेळगाव : कौटुंबिक वादातून सुनेने सासू आणि पतीवर रॉडने केलेल्या हल्ल्यात सासूचा मृत्यू झाला, तर पतीही गंभीर जखमी झाला. ही घटना बैलहोंगल येथे मंगळवारी (ता. १३) सायंकाळी घडली. मेहबुबी याकुशी (वय ५३) असे मृत सासूचे नाव आहे.

मेहरून्नी सुबान याकुशी असे हल्लेखोर सुनेचे नाव आहे. याबाबत सुनेसह तिच्या दोन भावांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची नोंद बैलहोंगल पोलिस ठाण्यात (Bailhongal Police Station) झाली आहे. याबाबत माहिती अशी ः मेहरून्नीसा हिचा बैलहोंगल येथील सुबान याकुशी याच्यासोबत विवाह झाला होता.

Crime News
Cyclone Biparjoy Alert : कोकण किनारपट्टीवर 'या' कारणामुळं मोठ्या लाटा; तज्ज्ञांकडून महत्वाची अपडेट समोर

विवाहानंतर सुबानची आई मेहबुबी आणि मेहरून्नीसा यांच्यात वारंवार भांडण होत असे. त्यामुळे मेहरून्नीसाने विभक्त होण्याचा हट्ट पतीकडे धरला होता. मात्र, त्यास सुबान तयार नव्हता. पतीने दुसरे घर बांधावे, असे मेहरून्नीसाला वाटत होते; पण सुबान आईपासून विभक्त होण्याच्या तयारीत नव्हता.

Crime News
'या' राज्यात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या; राहुल गांधींसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोर्टाचं समन्स

त्यामुळे त्यांच्यात वाद विकोपाला गेला. मंगळवारी सायंकाळी मेहरून्नीसाने आपल्या दोन भावांसह पती आणि सासूवर रॉडने हल्ला केला. त्यात मेहबुबी यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर पती सुबान गंभीर जखमी झाला. सुबानवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर मेहरून्नीसा आणि तिचे भाऊ फरार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com