

Woman lawyer death delhi crime news
esakal
Woman lawyer husband accused : नवी दिल्ली येथील हैदरपूर उड्डाणपुलाखाली मृतावस्थेत आढळलेल्या ४२ वर्षीय महिला वकिलाने पतीसोबत रस्त्यात झालेल्या वादानंतर उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीने तिला उड्डाणपुलावरून ढकलून दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून, कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.