फेसबुकवरून दोन वर्षांनी केला बलात्काराचा खुलासा

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

तिरुअनंतपुरम- पतीच्या मित्रांनी केलेल्या सामूहिक बलात्काराचा खुलासा दोन वर्षांनंतर पीडित महिलेने फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.

तिरुअनंतपुरम- पतीच्या मित्रांनी केलेल्या सामूहिक बलात्काराचा खुलासा दोन वर्षांनंतर पीडित महिलेने फेसबुकच्या माध्यमातून केला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 'एका महिलेवर पतीच्या चार मित्रांनी दोन वर्षांपुर्वी बलात्कार केला होता. बलात्कार करणारे स्थानिक राजकीय नेते आहेत. पतीचे मित्र असल्यामुळे याबाबतची वाच्यता तिने केली नव्हती. असह्य झाल्यानंतर पीडित महिलेने याबद्दलची माहिती तिच्या फेसबुकवरून शेअर केली. सोशल नेटवर्किंगवरून ही माहिती मोठ्या प्रमाणात शेअर झाली. मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत संबंधित माहिती पोचल्यानंतर बलात्कार करणाऱयांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'

दरम्यान, या घटनेबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Woman raped by hubby's friends speaks up after 2 years on Facebook