मातेसमोर केला युवतीवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

रस्त्याशेजारी असलेल्या उसाच्या शेतात युवतीवर दोघांनी मातेसमोरच बलात्कार केला. पीडित युवतीच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे.

मुझफ्फरानगर (उत्तर प्रदेश): एका 22 वर्षीय युवतीवर तिच्या मातेसमोरच दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

पोलिस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकरौली भागामध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. पीडित युवती आपल्या आईसह वैद्यकीय औषधे आणण्यासाठी दुकानात गेली होती. घरी परतत असताना दोन युवकांनी त्यांना रस्त्यात अडवले. रस्त्याशेजारी असलेल्या उसाच्या शेतात युवतीवर दोघांनी मातेसमोरच बलात्कार केला. पीडित युवतीच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित युवतीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Woman raped by two youths in front of mother at uttar pradesh