चहाविक्रेत्या महिलेने परत केली 10 लाखाची बॅग

वृत्तसंस्था
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

चेन्नई - एका चहाविक्रेत्या महिलेला सापडलेले साडे नऊ लाख रुपयांचे सोने, दोन मोबाईल फोन आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम असा दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा दस्तऐवज असलेली पिशवी तिने मूळ मालकाला परत केली असून त्याबद्दल पोलिसांनी तिचे कौतुक केले आहे.

चेन्नई - एका चहाविक्रेत्या महिलेला सापडलेले साडे नऊ लाख रुपयांचे सोने, दोन मोबाईल फोन आणि 10 हजार रुपयांची रोख रक्कम असा दहा लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा दस्तऐवज असलेली पिशवी तिने मूळ मालकाला परत केली असून त्याबद्दल पोलिसांनी तिचे कौतुक केले आहे.

रामेश्‍वरम येथील अन्वर खान आपल्या कुटुंबियांसोबत चेन्नईमध्ये पर्यटनासाठी आले होते. शहरातील विविध पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर ते रविवारी संध्याकाळी मरिना बीचवर पोचले. तेथे बराच वेळ घालवल्यानंतर ते परतण्यासाठी आपल्या मोटारीत बसले. मोटार सुरू करताना सोने, रोकड आणि इतर ऐवज असलेली पिशवी हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत बीचवर अंधार झाला होता. चिंताग्रस्त झालेले खान कुटुंबिय पुन्हा बीचवर येऊन अंधारात आपली पिशवी शोधू लागले. मात्र बराच वेळ शोध घेऊनही पिशवी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली. दरम्यान बीचवर चहा विक्रीचे दुकान बंद करून निघालेल्या अमिधाला (वय 28) ही बॅग दिसली. तिने बॅग घेऊन थेट जवळचे पोलिस स्थानक गाठले. त्यावेळी खान कुटुंबिय पोलिस स्थानकातच उपस्थित होते. त्यानंतर पोलिसांनी ती पिशवी मूळ मालकाला परत केली.

एवढ्या मोठ्या मौल्यवान वस्तू असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल पूर्व विभागाचे पोलिस सह आयुक्त मनोहरन यांनी अमिधाचे कौतुक केले. "मी गरीब कुटुंबातून आलेली आहे. त्यामुळे ज्यांचा एवढा मोठा ऐवज हरवला आहे त्यांची व्यथा मी समजू शकते. मूळ मालकाला ती पिशवी परत दिल्यानंतरचे समाधान आणि पोलिसांनी केलेले कौतुक माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे‘ अशा प्रतिक्रिया अमिधाने व्यक्त केल्या.

Web Title: The woman returned to the vendor 10 lakh Tea Bag

टॅग्स