शरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलिसांनी बॅंकेच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कर्नाटकमधील दावणगिरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डीएचएफएल बँकेच्या स्थानिक शाखेत दोन लाख रुपयांचे कर्ज मागण्यासाठी गेली होती. यावेळी बॅंकेच्या व्यवस्थापकाने कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. व्यवस्थापकाने केलेली मागणी ऐकताच महिला भडकली. महिलेने बँकेच्या व्यवस्थापकाची कॉलर पकडली आणि त्याला ओढत बँकेबाहेर ओढत आणले. बँकेच्या बाहेर आणल्यानंतर लाकडी दांडक्यासह चपलेने बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. संबंधित प्रकार पाहून बँकेचे कर्मचारी व्यवस्थापकाला वाचवायला धावले. काही वेळानंतर त्यांनी बँकच्या व्यवस्थापकाची महिलेच्या तावडीतून सुटका केली. संबंधित प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. ही क्लिक सोशल मीडियावर व्हायल झाली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Woman thrashes bank manager over sex for loan demand at karnataka