Dowry Harassment
ESakal
देश
Crime: लग्नात ४५ लाख खर्च, तरीही लोभ कायम; आधी हनिमून साजरा, नंतर पतीनं बोटीवर भयानक कट रचला, नवविवाहितेसोबत काय घडलं?
Dowry Harassment Case: एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या पतीवर गोव्यात मधुचंद्राच्या वेळी बोट उलटून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून नातेसंबंधांना लाज आणणारा एक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे सर्वांचेच मन हेलावून गेले आहे. एका विवाहित महिलेने तिच्या पती आणि सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहेच, पण तिच्या पतीने त्यांच्या मधुचंद्राच्या वेळी तिला मारण्याचा भयानक कट रचल्याचा दावाही केला आहे. प्रेम आणि विश्वासाच्या नात्याला लोभासाठी बळी दिल्याने हे प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे.

