महिला लैंगिक शोषण प्रकरण : 'माजी पंतप्रधानांच्या नातवाला आणण्यासाठी SIT परदेशात जाणार नाही'; गृहमंत्र्यांची माहिती

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचा नातू ३३ वर्षीय प्रज्वल रेवण्णा याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
Hasan MP Prajwal Prajwal Home Minister G. Parameshwara
Hasan MP Prajwal Prajwal Home Minister G. Parameshwaraesakal
Summary

खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नाकारले.

बंगळूर : हसन खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करणारे विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांना परत आणण्यासाठी परदेशात जाणार नाही आणि इंटरपोलच त्याच्याबद्दलची माहिती कळवेल, असे गृहमंत्री जी. परमेश्वर (Home Minister G Parameshwara) यांनी रविवारी सांगितले.

संवेदनशील असलेल्या या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांना सार्वजनिक विधाने करणे किंवा माहिती सामायिक करण्याबाबतही त्यांनी सावध केले. धजदचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचा नातू ३३ वर्षीय प्रज्वल रेवण्णा याच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-धजद यांच्यात राजकीय वादळ उठले आहे.

Hasan MP Prajwal Prajwal Home Minister G. Parameshwara
Satara Lok Sabha : निवडणूक खर्चात उदयनराजे आघाडीवर तर, शशिकांत शिंदे दुसऱ्या क्रमांकावर; किती केलाय दोघांनी खर्च?

कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या (Karnataka Lok Sabha Elections) पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर २७ एप्रिल रोजी प्रज्वल रेवण्णा परदेशात गेले होते. या टप्प्यात मतदान झालेल्या हसन लोकसभा मतदारसंघातून ते भाजप-धजद युतीचे संयुक्त उमेदवार होते. प्रज्वलबाबत ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे आणि आतापर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. ज्या देशात तो सापडेल किंवा ओळखला जाईल, तेथील यंत्रणा इंटरपोलला कळवतील. त्यानंतर आमच्या एजन्सी सीबीआयला कळवतील, असे परमेश्वर म्हणाले.

या प्रकरणासंदर्भात परदेशात गेलेल्या एसआयटी पथकाच्या अहवालाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘तपास सुरू आहे, तपासावर परिणाम होऊ नये, आम्हाला कोणतीही माहिती शेअर करायची नाही. माझी जनतेला आणि आमच्या नेत्यांना विनंती आहे की विधाने करताना सावधगिरी बाळगावी. तसे न केल्यास, त्यांनी दिलेल्या विधानांच्या आधारे, आम्हाला त्यांना चौकशीसाठी बोलावून कलम ४१ एअंतर्गत त्यांचे म्हणणे नोंदवावे लागेल.’

Hasan MP Prajwal Prajwal Home Minister G. Parameshwara
पुणे-सोलापूर महामार्गावर 40 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; ट्रकच्या धडकेत एक ठार, 4 जण गंभीर जखमी

धजद नेते एच. डी. कुमारस्वामी यांनाही नोटीस बजावली जाईल का, असे विचारले असता मंत्री म्हणाले, की ते माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले असावे. त्यामुळे या प्रकरणावर कोणतेही विधान करण्यापूर्वी किंवा सार्वजनिक डोमेनमध्ये कोणतीही माहिती सामायिक करण्यापूर्वी, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि हे सर्वांना लागू होते.

Hasan MP Prajwal Prajwal Home Minister G. Parameshwara
High Court : माजी सहकारमंत्र्यांचा 'तो' आदेश न्यायालयाकडून रद्द; 'जय भवानी'च्या चौकशीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्र्यांनी नाकारला सीबीआय तपास

खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नाकारले. ‘या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकावर आपला विश्वास आहे. सीबीआय तपासाची मागणी करून भाजपच्या स्थानिक यंत्रोंणांबाबत प्रश्नचिन्ह करत आहे. विरोधी पक्ष पोलिसांवर विश्वास का ठेवत नाही, असा सवाल केला. निष्ठेने तपास करणाऱ्या ‘एसआयटी’बद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने दिशाभूल करणारी विधाने केली जात आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com