महिला पोलिस कर्मचाऱ्यावर ऍसिड हल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर.

वेल्लूर (तमिळनाडू) : एका महिला पोलिस कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने केलेल्या ऍसिड हल्ल्यात महिलेचा चेहरा आणि उजवा हात भाजला आहे.

येथील महिला पोलिस स्थानकात काम करणाऱ्या लावण्या या शुक्रवारी रात्री काम संपवून घरी निघाल्या होत्या. दरम्यान, गणवेशात असलेल्या लावण्यावर चेहरा झाकून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने ऍसिडचा हल्ला केला. या हल्ल्यात लावण्याच्या डोळ्याला इजा पोहोचली आहे. त्यामुळे त्यांची दृष्टि गेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्यावर सध्या एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्यापही हल्लेखोर सापडलेला नाही. हल्लेखोराला शोधण्यासाठी पोलिसांनी पाच जणांचे विशेष पथक स्थापन केले आहे.

दरवर्षी महिलांवर हजारो ऍसिड हल्ले होतात. मात्र त्यापैकी काही हल्ल्यांचीच अधिकृतपणे नोंद होते. हल्लेखोर बदला घेईल, या भावनेने अनेक हल्ल्यांबद्दल तक्रार केली जात नाही. निर्भया प्रकरणानंतर 2013 साली नागरिकांच्या दबावामुळे ऍसिड हल्ला हा स्वतंत्र गुन्हा मानण्यात येत आहे. बहुतेक हल्ले हे एकतर्फी प्रेमातून केले जातात. त्याशिवाय ऍसिडची सहज उपलब्धता असल्यानेही हल्लेखोरांना भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचे आढळून आले आहे.

Web Title: Women constable attacked with acid in Tamil nadu