sangli
sanglisakal

रणरागिणींचा स्वातंत्र्य संग्राम

स्त्रियांच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागास प्रेरणा देणारी ठरली.

Independence Day : स्वातंत्र्य लढ्याच्या मवाळ आणि जहाल युगापेक्षा गांधी युगात स्त्रियांचा चळवळीतील सहभाग वाढला. तो अचंबित करणारा होता. १२ नोव्हेंबर, १९२० रोजी ‘टिळक फंड निधी संकलना’साठी महात्मा गांधीजींनी सांगलीला दिलेली भेटही या परिसरातील स्त्रियांच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागास प्रेरणा देणारी ठरली.

सविनय कायदेभंग चळवळ, असहकार आंदोलन, ‘भारत छोडो’ आंदोलनात सांगली परिसरातील स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा होता. स्वातंत्र्य चळवळीतील रोमहर्षक कालखंड म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकार चळवळ.

१९४२ ते ४६ या कालखंडात सांगली, सातारा परिसरालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला भारावून टाकले होते. लीलाताई पाटील, राजमती पाटील, हौसाताई चौगुले, इंदूताई पाटणकर, लक्ष्मीबाई नाईकवाडी, कळंत्रेअाक्कांसह कित्येक स्त्रियांनी स्वातंत्र्यसंग्रामात झोकून दिले होते. यांसह असंख्य अज्ञात स्त्रियांचे योगदान राहिले.

जिल्ह्यातील रणरागिणी स्वातंत्र्यलढ्यात लढल्या. त्यापैकी एक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील. १९६० नंतर गाव, तालुक्यातल्या अनेक महिलांना हौसाक्कांनी बळ दिले. श्रीमती राजमती पाटील-बिरनाळे यांचेही या लढ्यातील योगदान खूप महत्त्वाचे आहे. टिळक चौकात भारताचा तिरंगाध्वज फडकावल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता.

गोवा, बेळगाव, नाशिकहून बंदुका व काडतुसे गोळा करून त्यांनी प्रतिसरकार चळवळीला पुरविली. स्वातंत्र्यसेनानी इंदूताई पाटणकर यादेखील प्रतिसरकारच्या चळवळीच्या आधारस्तंभ होत्या. क्रांतिसिंहां‍च्या नेतृत्वाखालील आंदोलनात बाबूजी पाटणकर, नागनाथअण्णा, जी. डी. बापू यांच्याबरोबरीने त्या सहभागी झाल्या. १९४३ ला प्रतिसरकारच्या भूमिगत चळवळीत त्या सहभागी झाल्या. सांगलीवाडीतील कृष्णाबाई कुलकर्णी यांच्या दारूबंदीसाठीच्या निदर्शनाने व चंपाबाई सुलतान, कळंत्रेआक्कांच्या खादी चळवळीने या भूमीतील स्त्रियांमध्ये क्रांतीचा अंगार फुलवला गेला.

...अशी केली शस्त्रलूट

गोव्यातील पोर्तुगीजांच्या कैदेत असलेल्या बाळ जोशींची बहीण म्हणून कसा प्रवेश मिळवला, रेल्वे रूळ उखडण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने कशा गेलो, याच्या आठवणी हौसाक्का पाटील सांगत. एक आठवण भवानीनगर येथील पोलिस ठाण्यातून केलेल्या शस्त्रलुटीची. ‘ही नांदायला जात नाही’ म्हणून हौसाबाईंना पोलिस ठाण्यासमोर त्यांचा ‘भाऊ’ आणि ‘नवरा’ मारहाण करू लागले. तेव्हा या ठाण्यामधील पोलिस धावत बाहेर आले, प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करू लागले, तोवर शस्त्रलूट फत्ते झाली.

स्वातंत्र्यलढ्यात जिल्ह्यातील स्त्रियांचे असणारे ऐतिहासिक योगदान आपणास सातारा जिल्ह्याच्या तत्कालीन भौगोलिक परिघात पाहावे लागते. हा लढा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा म्हणून जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो शतकानुशतके घराच्या चार भिंतींच्या आत असलेल्या स्त्रियांनी प्रचंड प्रमाणावर सामाजिक अवकाशात प्रवेश करण्याचा आरंभबिंदू म्हणून महत्त्वपूर्ण आहे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com