महिलांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा अन्यथा विनापत्य रहावे - भाजप आमदार

Women should give birth to a cultured child
Women should give birth to a cultured child

मध्य प्रदेश : भारतीय महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा. समाजात विकृती निर्माण करणारे दुर्गूण असणाऱ्या मुलांना महिलांनी जन्मच देऊ नये. ही मुले मोठी होऊन समाज भ्रष्ट करतात. कॉंग्रेसच्या काळात चुकीचे धोरण आखणारे नेते जन्माला आले. या सर्व नेत्यांना कोणत्यातरी महिलांनीच जन्म दिला असेल. असे बेताल आणि वादग्रस्त व्यक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार पन्नालाल शाक्य यांनी केले. 

पन्नालाल एवढ्यावरच थांबले नाहीत, तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराठ कोहली हा देशभक्त नाही. "कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्मा हीच्याशी देशाच्या बाहेर जाऊन लग्न केले. ज्या देशात राम, कृष्ण, युधीष्ठीर या सर्वांची लग्न झाली आहेत. कोहली भारतात राहून पैसै कमवतो आणि लग्न बाहेरच्या देशात जाऊन करतो. ही खरी देशभक्ती नाही. त्याला लग्नासाठी देशात एकही ठिकाण सापडले नाही. हिंदूस्थान अस्पृष्य आहे का? कोहली हा तरुणांचा आदर्श असू शकत नाही. कारण त्याने इटली मध्ये जाऊन लग्न केले आहे."

मुख्यमंत्री जनकल्याण योजनेच्या सरकारी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पन्नालाल शाक्य उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी बेताल विधान केले. पन्नालाल म्हणाले, "काँग्रेसने पूर्वी गरीबी हटाव, असा नारा दिला. पण देशातील गरीबी कमी झाली नाही. कॉंग्रेसच्या काळात चुकीचे धोरण आखणारे नेते जन्माला आले. या सर्व नेत्यांना कोणत्यातरी महिलांनीच जन्म दिला असेल. महिलांनी संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा अन्यथा विनापत्य रहावे."

या आधीही पन्नालाल यांनी वादग्रस्त विधाने केली आहे. मुलींनी मित्र बनविण्याची संस्कृती पाश्चात्यांची आहे. मुली (बॉयफ्रेंन्ड) मित्र का बनवता? जर त्यांनी हे थांबले तर त्यांच्यावरली अत्याचार कमी होती. असेही विधान पन्नालाय यांनी करून वाद ओढवून घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com