राजीनाम्यानंतर मोफतमध्ये उपचार झाले नसते; मूड बदलल्यावर भाजप खासदाराचं वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 December 2020

गुजरातचे भाजप खासदार आणि माजी मंत्री मनसूख वसावा (Mansukh Vasava) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता.

अहमदाबाद- गुजरातचे भाजप खासदार आणि माजी मंत्री मनसूख वसावा (Mansukh Vasava) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नेत्यांच्या मनधरणीनंतर त्यांनी आपला राजीनामा वापस घेतला. राजीनामा परत घेण्यामागे त्यांनी अजब कारण सांगितलं आहे. पक्षाचा राजीनामा दिला असता, तर त्यांना मोफतमध्ये उपचाराची सुविधा मिळाली नसती (Wont Get Free Medical Treatment) , असं ते म्हणाले आहेत. 

नव्या कृषी कायद्यांबाबत भीती ठरतेय खरी; व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक!

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर काय म्हणाले वसावा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला समजावलं की, माझी पाठ आणि गळ्याच्या त्रासासाठी मोफतमध्ये उपचार तेव्हाच मिळेल, जेव्हा मी खासदार पदावर कायम राहिन. मी राजीनामा दिला असता तर असं शक्य झालं नसतं. पक्षाच्या नेत्यांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अशी सिस्टिम बनवण्यात येईल, ज्यामुळे स्थानिक नेते माझ्या वतीने कामकाज पाहतील.

आरोग्याच्या कारणास्तव दिला राजीनामा

राजीनामा देण्यामागे माझं एकमेव कारण आरोग्य समस्या होती. आता वरिष्ठ नेत्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर मी आपला राजीनामा वापस घेत आहे. मी एक खासदार म्हणून लोकांची सेवा करत राहिन, असं मनसूख वसावा म्हणाले आहेत.

आईचा खून केल्यानंतर मुलगा म्हणाला,'स्वर्गातून वडिलांनी दिलेल्या आदेशाचं...

पक्षासोबत मतभेद नाही

मी पक्षावर नाराज असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मुख्य करुन नर्मदा जिल्ह्याच्या इको सेंसेटिव्ह झोनचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पण, खरं पाहिलं तर राज्य आणि केंद्र सरकार आपले प्रयत्न करत आहे. माझे पक्षासोबत कोणतेही मतभेद नाहीत. आदिवासी नेता वसावा म्हणाले की, भाजप सरकारने माजी सरकारांपेक्षा आदिवासींना खूप फायदा पोहोचवला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wont Get Free Medical Treatment if i resign Mansukh Vasava bjp mp